क्रीप्टोकरन्सी (cryptocurrency)

 


बहुतांशी लोकांना माहिती आहे आणि बहुतांशी नाहीही. करन्सी म्हणजे चलन , हे तर आपल्याला माहितीये आणि क्रीप्टो हे त्या चलनाच नाव आहे.हे एक डिजिटल चलन आहे.आता डिजिटल म्हणजे काय ? याला भारतातही आता परवानगी मिळाली आहे. अगदीच अधिकृत नाही पण पूर्णपणे अनधिकृत ही नाही हे चलन भारतात.तेच आपण आज पाहणार आहोत.

💡टेबल ऑफ कंटेंट :






क्रीप्टो करन्सी कशी काम करते ( how cryptocurrency work's) :

क्रीप्टो करन्सी म्हणजे काय ? ( What is cryptocurrency) :

देश आणि जगातील कोणतीही व्यक्ती, संस्था आणि देश यांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि व्यवहारांना चालना देण्यासाठी चलन आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक देशाचे स्वतःचे चलन आहे , तसेच क्रीप्टो करन्सी हे देखील एक चलन आहे. याला vartual म्हणजेच आभासी चलन अस म्हटल जात. आपण त्याला पाहू आणि स्पर्श करू शकत नाही. हे चलन कोणताही देश , संस्था किंवा सरकारद्वारे चालवले जात नाही. या चलनासाठी क्रीप्टो ग्राफी तंत्रज्ञान वापरले जाते. 

क्रीप्टो करन्सी ला डिजिटल करन्सी अस देखील म्हटल जात. जिचा उपयोग करून आपण ऑनलाईन व्यवहार करू शकतो.ही ब्लॉकचैन वर आधारित virtual म्हणजे आभासी करन्सी आहे.

क्रीप्टो करन्सी चे प्रकार (Types of cryptocurrency) :

सध्या क्रीप्टो मधे झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.  क्रीप्टो चे व्यवहारात 2000 पेक्षा जास्त प्रकार आहेत. याला गेल्या काही वर्षामध्ये खूप झपाट्याने स्वीकारलं गेलय याचे भारतात मोठ्या प्रमाणात investor पाहायला मिळत आहेत.याचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात. 

a) नाणी आणि अलटकॉइन (coins and altcoins)

b) टोकन (Tokens)

नाणी आणि अल्टकॉइन : नाणी म्हणजे कोणतीही क्रीप्टो करन्सी जी स्वतःची स्वतंत्र ब्लॉक चेन वापरते. उदा., बिटकॉइन 

अल्ट कॉइन हा शब्द बिटकॉईन व्यतिरिक्त इतर कोणत्याही नाण्याला देण्यासाठी वापरला जातो. अनेक अल्टकॉइन आहेत जे बिटकॉइन प्रमाणे कार्य करतात. 

टोकन : नाण्यांप्रमानेच टोकन ही देखील डिजिटल मालमत्ता आहे. याचा वापर करूनही ऑनलाईन खरेदी विक्री करू शकतो. परंतु ही दुसऱ्या ब्लॉक चेनच्या पायाभूत सुविधांचा वापर करते.उदा., टीथर यामध्ये पुढीलप्रमाणे प्रकार आढळतात.,

  1. बिटकॉईन (Bitcoin)
  2. ईथेरीअम (Ethereum)
  3. बिनन्स कॉइन (Binance coin)
  4. टीथर (Tether VSDT)
  5. सोलाना (Solana SOL)
  6. एक्स आर पी (XRP)
  7. कार्डानो (Cardano ADA)
  8. यू एस डी कॉइन (USD)
  9. लितेकॉइन (Litecoin)
  10. पॉलीगॉन (polygon)
  11. युनीस्वॅप (Uniswap) 
  12. आव्हे (AAVE)
  13. अव्हलांचे (AVAX)
  14. पोल्काडॉट ( polkadot)
  15. स्टेलर (Steller)
  16.  डॅश (Dash)
  17. मोनेरो (monero)
  18. डोगेकॉइन (Dogecoin)
  19. कॉसमॉस (Cosmos)
  20. मार्कर( marker) इ.

1) बिटकॉइन (Bitcoin) :

ही सर्वात मोठी आणि महत्वाची क्रीप्टो करन्सी आहे. बीटकॉइन ही मुळ क्रीप्टोकरन्सी आहे. बिटकॉइन ची मुल्यवृद्धी शानदार आहे. अल साल्वाडोर ने तर याला फियाट चलनाच्या रुपात स्वीकृती दिली आहे. त्यामुळेच याच्या लोकप्रियतेत आणि संपत्तीत वाढ झाली आहे.याला काही लोक डिजिटल गोल्ड म्हणतात.हे ब्लॉकचेन वर चालते.

2) इथेरियम (Ethereum ETH) :

हे एक ब्लॉकचेन नेटवर्क आहे.जे ETM किंवा इथर चे मुळ टोकन आहे. सामान्यतः याला क्रीप्टो करन्सी म्हणून संबोधले जाते.हे सतत आपग्रेड करण्याचा आणि टॉप वर राहण्याचा प्रयत्न करत असत.

3) बिनन्स कॉइन (Binance coin) :

ही तिसरी सर्वात लोकप्रिय क्रीप्टो करन्सी आहे.ही ट्रेडींग, पेमेंट प्रोसेसिंग किंवा प्रवास बुकींग साठी वापरली जाते.ही वरील दोन्ही प्रमाणे व्यापार आणि देवाण घेवाण ही करू शकते.

4) टीथर (Tether VSDT) :

टीथर ही एक वेगळ्या प्रकारची क्रीप्टो करन्सी आहे.ज्याला stable coin फियाट म्हणतात.ज्याला अमेरिकन डॉलर सारख्या चलनाचा आधार आहे.त्यामुळे ते स्थिर आहे.त्यामुळे ते अधिक विश्वासार्ह आणि सुसंगत बनते. 

5) सोलाना (Solana SOL) :

हे हायब्रीड - प्रूफ ऑफ स्टेक आणि प्रूफ ऑफ हिस्ट्री mechanisms साठी बातम्यांमध्ये आहे.यामुळे व्यवहार जलद आणि सुरक्षित होतात.याची तुलना एथेरियम सोबत केली जाते.

6) एक्स आर पी (XRP) : 

डिजिटल टेक्नॉलॉजी कंपनी रीपलच्या नंतर त्याच टीम ने XRP तयार केली होती. जी फियाट करन्सी आणि इतर प्रमुख क्रीप्टो करन्सी सह विविध चलन प्रकारांची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी नेटवर्क वापरली जाते.

7) कार्डानो (Cardano ADA) : 

ही एक नवीनतम क्रीप्टो करन्सी आहे. पण त्याने एक स्प्लाश बनवला आहे.हे कमी ऊर्जा वापरणारे व्यवहार वैध करण्यासाठी नवीन प्रूफ ऑफ स्टेक पद्धतीवर अवलंबून राहण्यासाठी ओळखले जाते.

8) यू एस डी कॉइन (USD) : 

हा एक स्थिर कॉइन आहे. हे एथेरिअम द्वारा समर्थित आहे. जागतिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी वापरले जाते.

9) लितेकॉइन (Litecoin) : 

Litecoin चा जन्म 2011 मधे बीटकॉइन ला चांगला पर्याय म्हणून झाला. जो खूप तेजी ने ब्लॉक पिढी आणि अधिक कुशल शुल्क ची पेशकश करत होता.

10) पॉलीगॉन (polygon) : 

Polygoan (MATIC ) इथेरियम चा पुरक आहे. आणि ह्या नेटवर्क ची मापनियता आणि उपयोग वाढवतो. Polygon नेटवर्क एक साइट कॉरिडॉर क्या रुपात काम करतो. 

11) युनीस्वॅप (Uniswap) : 

युनीस्वॅप आपल्याला एथेरीअम नेटवर्क वर स्मार्ट अनुबंधाचा उपयोग करून विकेंद्रिकृत पद्धतीने क्रीप्टो करन्सी च आदानप्रदान करण्याची परवानगी देते. युनीस्वॅप प्रोटोकॉल उपभोक्त्याना सिस्टीम मध्ये तरलता अंतः क्षेपणच्या माध्यमातून आय उत्पन्न करण्याची परवानगी देते.

12) पोल्काडॉट ( polkadot ) :

2020 मधे पोल्काडॉट ( polkadot) लाँच करण्यात आले. पोल्का डॉट ची खासियत अशी आहे की ते क्रीप्टो करन्सी नेटवर्क तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. जे विविध ब्लॉकचेन ना जोडते . हे एथेरियमच्या खूप जवळ आहे.

13) स्टेलर (Steller) :

Steller नेटवर्क आणि steller Lumens डिजिटल करन्सी साठी 2022 खूपच सकारात्मक वर्ष गेले. हे एक कुशल प्लॅटफॉर्म च्या रुपात समोर आले.ज्यामधे सर्व क्रीप्टो करन्सी एकच वॉलेट मधे एकिकृत करण शक्य आहे.

 14) डॅश (Dash) :

 डॅश (Dash) क्रीप्टो करन्सी देवाणघेवाण मधे लागणारा खर्च कमी करण्यासाठी आणि बीट कॉईन सारख्या अन्य क्रीप्टो करन्सी मधे मापनियाता सारख्या समस्यांवरती नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने बनविण्यात आले आहे.खूपच कमी कमिशन सोबत तत्काळ भुगतन या कारणासाठी डॅश नाणे पारंपरिक वित्तीय प्रणाली साठी एक क्रांती आहे.डॅश कॉइन च लक्ष्य दक्षिण अमेरिका आहे.

15) मोनेरो (monero) :

2024 च्या टॉप क्रीप्टो करन्सी लिस्ट मधील पुढची क्रीप्तो करन्सी आहे. ही आपल्या उपभोकत्याना गोपनीयता प्रदान करण्यावर भार देते. 

क्रीप्टो करन्सी चे फायदे आणि तोटे ( advantages and disadvantages of cryptocurrency) :

◾क्रीप्टो करन्सी चे फायदे (Advantages of cryptocurrency) : 

  • क्रीप्टो करन्सी चे स्वरूप डिजिटल असल्यामुळे व्यवहारात फसवणूक होण्याची शक्यता खूप कमी असते.
  • क्रीप्टो करन्सी गुंतवणुक करणे सोपे आहे , कारण क्रीप्टो करन्सी साठवणूक करण्यासाठी अनेक वॉलेट उपलब्ध आहेत.
  • क्रीप्टो करन्सी वर को. ऑपरेटिव्ह संस्था , बँक किंवा सरकारचे नियंत्रण नसल्याने नोटबंदी किंवा चलनाची किंमत कमी होण्याचा धोका नसतो.
  • क्रीप्टो करन्सी चे व्यवहार खूप सुरक्षित चालतात , साधारण व्यवहार आणि क्रीप्टो व्यवहार यामधे खूप फरक असतो.
  • क्रीप्टो करन्सी चा वापर पैसे लपवून ठेवण्यासाठी केला जातोय . खरं तर पैसे लपवून ठेवणाऱ्या लोकांकरिता हा उत्तम पर्याय आहे.
  • क्रीप्टो चलनात गुंतवणूक करणे खूप फायद्याचे ठरते , कारण त्यांच्या किमती खूप लवकर वाढतात.
  • असे अनेक देश आहेत जिथे भांडवल नियंत्रण नाही.त्यामुळे क्रीप्टो करन्सी सहज खरेदी करून देशाबाहेर पाठवता येते. आणि नंतर त्याचे पैशात रूपांतर करता येते.
  • व्यवहार शुल्क नगण्य किंवा शून्य रकमेपर्यंत कमी केले जाते.
  • व्यवहाराची पडताळणी करण्यासाठी VISA किंवा pay pal सारख्या तृतीय पक्षांची गरज दूर करते.
  • क्रीप्टो करन्सी US डॉलर, युरोपियन युरो , ब्रिटिश मापन एकक , भारतीय रुपया किंवा जपानी येन यांसारख्या अनेक चलनांचा वापर करून खरेदी करता येते. क्रीप्टो करन्सी वॉलेट आणि एक्सचेंज क्रीप्टो करन्सी मधे ट्रेडिंग करून एका चलनाचे दुसऱ्या चलनात रूपांतर तेही किमान व्यवहार शुल्क भरून होते.

◾ क्रीप्टोकरन्सी चे तोटे ( Disadvantages of cryptocurrency) :

  • क्रीप्टो करन्सीचा वापर अनेकजण पैसे सरकारपासून लपवून ठेवण्यासाठी करतात. यामुळेच अनेक देशांनी यावर बंधने घातली आहेत.
  • क्रीप्टो करन्सी हॅक होण्याची शक्यता जास्त असते जर कोणी आपले कॉइन हॅक केले तर ते परत मिळण्याची शक्यता शून्य असते.
  • क्रीप्टो करन्सी स्टोअर केलेला वॉलेट आयडी जर विसरलात तर पुन्हा मिळत नाही. त्यामुळे त्यातील पैसे ही कधीच नाही काढू शकत.
  • क्रीप्टो करन्सी मधून चुकून आपल्याकडून जर एखाद्याला पेमेंट गेलं तर ते परत मिळवू शकत नाही.
  • क्रीप्टो करन्सीचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्याच भौतिक अस्तित्व नाही. कारण ते परत छापले जाऊ शकत नाही. म्हणजे या चलनाच्या नोटा छापल्या जाऊ शकत नाहीत. किंवा कोणतेही बँक खाते किंवा पासबुक जरी करता येत नाही.
  • देश , सरकार , संस्था यांचं नियंत्रण नसल्यामुळे कधी कधी त्यांच्या किमतीत मोठी उडी होते तर कधी कधी खूप घसरण त्यामुळे क्रीप्टो करन्सी मधे गुंतवणूक धोकादायक ठरते.
  • चुकीच्या कामांसाठी याचा अगदी सहज वापर केला जाऊ शकतो. कारण ते फक्त दोन लोकांमध्येच वापरला जातो. जसं की काळाबाजार, अंमली पदार्थांचा पुरवठा , भ्रष्टाचार . 

क्रीप्टो करन्सी कशी काम करते ( how cryptocurrency work's) :

क्रीप्टो करन्सी ब्लॉकचेनच्या माध्यमातून कार्य करते. क्रीप्टो करन्सीच्या सर्व व्यवहाराच्या सर्व नोंदी ब्लॉकचेनच्या स्वरूपात ठेवल्या जातात. क्रीप्टोकरन्सी चे सर्व व्यवहार शक्तिशाली कॉम्प्युटरच्या नियंत्रणात केले जातात . त्याला क्रीप्टो करन्सी मा म्हणतात. यासाठी जे कॉम्प्युटर उपलब्ध करून दिले जाते त्यांना मायनर्स म्हणतात. क्रीप्टो करन्सी मधे जेव्हा व्यवहार (transactions) होतो तेव्हा तो ब्लॉकचेन मधे स्टोअर केला जातो. प्रत्येक व्यवहारला एका ब्लॉक मधे ठेवले जाते . हा ब्लॉक मायनर्स कडून सुरक्षा मिळवत असतो. मायनर्स चे कॉम्प्युटर या ब्लॉक क्या सुरक्षेसाठी गणितीय समीकरण सोडवून एक स्वतंत्र हॅश कोड बनवतात. ज्यामुळे ब्लॉकला एक विशिष्ट हॅश कोड मिळतो. प्रत्येक ब्लॉकचा हॅश कोड हा नेटवर्क मधील इतर कॉम्प्युटर सॉफ्टवेअर द्वारे पडताळुन पहिला जातो. पडताळणी झाल्यावर मायीन (mine) केलेली क्रीप्टो करन्सी ही मायनरला रीवार्ड म्हणून दिली जाते. मायनर ने सोडवलेले क्रीप्टोग्राफिक समीकरण पडताळणी करण्याच्या प्रक्रियेला एकमत , कन्सेंसस (consensus ) म्हणतात.अशा प्रकारे सुरक्षित व्यवहार चालतात. जे कोणत्याही संस्था , सरकारशिवाय चालवले जातात. 

धन्यवाद....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या