भारत आणि क्रीप्टो चलन (India and cryptocurrency)

 



भारतात आपण पाहतो की क्रीप्टो करन्सी बद्दल अजूनही खूप संभ्रमवस्था आहेत. क्रीप्टो करन्सी मधे गुंतवणूक करावी का ? क्रीप्टो भारतात कायदेशीर आहे का ? क्रीप्टो गुंतवणुकीसाठी भारतात कोणकोणते प्लॉटफॉर्म्स आहेत ? क्रीप्टो करन्सी वर भारतात कर आकारला जातो का ? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. 

टेबल ऑफ कंटेंट : 

















◾भारतात क्रीप्टो करन्सीला कायदेशीर परवानगी आहे का ? ( Does cryptocurrency is legal in india ? ) :

▪️2018 : 

एप्रिल 2018 मधे रिझर्व्ह बँकेने क्रीप्टो करन्सीच्या ट्रेडिंगवर सरसकट बंदी घातली. म्हणजे बँका किंवा इतर कोणत्याही वित्त संस्थांना व्हर्चुअल करन्सीशी निगडीत कोणतीही सेवा देता येणार नव्हती. इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ने याला कोर्टात आव्हान दिलं होत. इतर अनेक देशांनी क्रीप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगला परवानगी दिलेली आहे आणि इतकंच नाही तर स्वतःची क्रीप्टो करन्सी देखील लाँच केलेली आहे. अस इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन चे म्हणणे होते. यावर सुप्रीम कोर्टाने 2020 मधे व्यवहारांना मार्ग खुला केला.

▪️2022 : 

त्यानंतर 2022 मधे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2022 जाहीर केला. त्या अर्थसंकल्पामध्ये एक मुद्दा मांडण्यात आला. तो म्हणजे , भारतात डिजिटल चलनातून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30% कर आकारला जाईल. उदा., जर एखाद्या व्यक्तीने 100rs गुंतवले आणि त्याला 10rs परतावा मिळाला तर त्यातले 3rs सरकारला कर म्हणून द्यावे लागतील. 

▪️TDS ( Tax Deducted At Source ) :

डिजिटल चलनाच्या INR 50,000 पेक्षा जास्त वार्षिक व्यवहारावर 1% TDS सरकारला स्वतंत्रपणे द्यावा लागेल. डिजिटल गुंतवणूक म्हणजेच मालमत्ता जर दुसऱ्या कोणाला हस्तांतरित केली, तर त्याला मालमत्तेच्या एकूण मूल्यावर 1% दराने स्वतंत्र TDS भरावा लागेल. सरकार डिजिटल चलनाला एक उत्पन्नाचा स्त्रोत मानत आहे. त्यासोबतच त्याच्या कमाईवर 30% कर ही लावण्यात आला आहे.

▪️क्रीप्टो चलनाला कायदेशीर स्वीकृती मिळाली का : 

डिजिटल चलनावर कर लावला म्हणजे कायदेशीर केले का ? तर नाही . फक्त भारतीय रिझर्व्ह बँक जे डिजिटल चलन चालू करेल तेच कायदेशीर असेल.म्हणजे याचाच अर्थ असा होतो की सध्याचे क्रीप्टो करन्सी हे चलन कायदेशीर नाही. याउलट ती फक्त तुमची मालमत्ता म्हणून गणली जाईल. आणि सरकारकडून तुमच्या या मालमत्तेचा कर आकारला जाईल.म्हणजेच बीटकॉइन सारखे चलन कायदेशीर ठरवण्यात आले आहे अस म्हणणे तांत्रिकदृष्ट्या अजिबात योग्य ठरणार नाही. मात्र लोक गुंतवणूक करू शकतात. आणि असे असूनही भारतात डिजिटल चलनात गुंतवणूक लक्षणीयरीत्या वाढली आहे.

▪️सरकारचा हेतू : 

सध्या अमेरिका, ब्रिटन , इटली , नेदरलँड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये डिजिटल चलनावर तिथल्या सरकारद्वारे कर आकारला जातो. या देशात हे चलन कायदेशीर मानल जात. हे एक कारण असू शकतं की भारत सरकारने असा निर्णय घेतला आहे. भारतात क्रीप्टो करन्सी मधे गुंतवणूक करणारे लोक देशाच्या लोकसंख्येच्या 8% आहेत.

क्रीप्टो चलन आणि इतर आभासी मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना त्यांचे उत्पन्न उघड करणे आवश्यक आहे. आणि त्यावर असणारे कर आणि TDS वेळच्या वेळी भरणे ही अनिवार्य आहे. असे न केल्यास त्याच्यावरती कलम 271C आणि 276B  मध्ये नमूद केल्याप्रमाणे दंड लागू करण्यात आला आहे.

◾भारतात वापरल्या जाणाऱ्या क्रीप्टोकरन्सी :

खरं तर भारतात क्रीप्टो करन्सी अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही . पण तरीही क्रीप्टो मधे गुंतवणूक करणाऱ्या लोकांमध्ये भारत पुढे आहे.आणि दिवसेंदिवस ते वाढतच आहेत. क्रीप्टो मार्केट मधे 20,000 च्या जवळपास क्रीप्टो उपलब्ध आहेत. क्रीप्टो इन्वेस्टर म्हणून आपल्याला हे माहीत असणे गरजेचे आहे की सगळे क्रीप्टो आपल्याला आपल्या पैशांचा योग्य मोबदला देतात का. ? आपण यामधे पाहुयात की टॉप क्रीप्टो कोणत्या आहेत. त्यांची मार्केट कॅप मधील रँकिंग आणि बरेच काही .

▪️भारतातील क्रीप्टो करन्सीची यादी ( C.C list in India ) :

इथे दिलेल्या लिस्ट मधील कोणतीही क्रीप्टो करन्सी निवेशक निवडू शकतात. क्रीप्टो ची मार्केट व्हॅल्यू ही सतत बदलत राहते. खाली दिलेली व्हॅल्यू ही जून 2024 मधील आहे.


नाणे (coin) market capitalisation सध्याची किंमत current price 
 Bitcoin(BTc)
$ 1.29 trillion  $65,824
Binance coin (BNB) $87 billion  $595
Solana (SOL) $66 billion $143

वरती थोड्याशा च दिलेल्या आहेत . क्रीप्टो व्हॅल्यू ही सतत बदलत राहते. त्यामुळे क्रीप्टो करन्सी मधे गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांची करंट स्थिती सांगणारे ॲप भारतात उपलब्ध आहेत. तिथे जाऊन आपण करंट स्थिती पाहून गुंतवणूक करू शकता. 

◾भारतात क्रीप्टो करन्सी मधे गुंतवणुक कशी करावी ? (How to invest in cryptocurrency in India) :

क्रीप्टो करन्सी मधे गुंतवणूक करण्यासाठी प्रथम योग्य व्यासपीठ निवडावे लागेल. योग्य व्यासपीठ नाही निवडला तर ट्रेडिंग करताना फी भरावी लागू शकते. 

खाली काही व्यासपीठाची माहिती दिली आहे.

A). गुंतवणूक करण्यासाठीचे व्यासपीठ ( ट्रेडिंग platforms ) :

  1. कॉइन स्विच (coin switch) :
  2. कॉइन डी सी एक्स ( coin DCX) : 
  3. वझिर एक्स ( Wazir X) :
  4. मुदरेक्स (Mudrex) :
  5.  झेबपे ( Zebpay) :
  6. बीट बी एन एस ( Bitbns) :
  7. यूनो कॉइन ( Uno coin) :
  8. बाय यू कॉइन ( Buy U coin ) :
  9. जीओट्टुस ( Giottus) :

खालील बाबी तपासून मगच योग्य तो प्लॅटफॉर्म निवडावा. 

  • नेहमी क्रीप्टो चलन विनिमयाची तरलता आणि व्यापार खंड तपासावा.
  • त्यांच्या सुरक्षा उपायांचे निरीक्षण करावे.
  • त्यांच्या ठेवी आणि क्रीप्टो फंडाचा विमा बॅकअप आहे की नाही ते तपासून पाहावे.
  • किंमत संरचनेसह ठेव आणि पैसे काढण्याची मर्यादा तपासा.

B). काही व्यासपीठाचा थोडक्यात आढावा ( A brief overview of some platforms ) :

⁠● कॉइन डीसीएक्स (Coin DCX) : 

कॉइन DCX हे 2018 मधे लाँच करण्यात आले. ही एक prominent मोबदला देणारी cryptocurrency आहे. सेंट्रलाइज्ड प्लॅटफॉर्म वरती याची नोंदणी सिंगापूर मधे केली जाते. भारतातील विस्तृत आणि सुरक्षित देवाणघेवाण करणारी अशी ओळख coin DCX ने बनवली आहे


मापदंड(parameters) कॉइन DCX
वैशिष्ट्ये (features)
वापरकर्ताशी मैत्रीपूर्ण (user friendliness) अंतरज्ञानी इंटर्फेस, विकसित ट्रेडिंग वैशिष्ट्ये, क्रीप्टो करन्सी चे अमर्याद चयन.
सुरक्षा वैशिष्ट्ये (security features) दोन भागांत प्रमाणीकरण (2FA) कटिबद्ध (encrypted) वापरकर्त्यांची माहिती. नियमित सुरक्षित लेखापरीक्षण.
नवशिक्यांसाठी मैत्रीपूर्ण (beginners friendliness) कमी ट्रेडिंग चार्जेस, एका टच वरती खरेदी आणि विक्री. UPI आणि IMPS चा स्वीकार. मार्जिन ट्रेडिंग हे सहा पटीने फायदेमंद.
दीर्घकालीन उपयोगिता (long term usability) आणि कमीतकमी गुंतवणूक (minimum investment) ट्रेडिंग साठी मोठ्या प्रमाणावर कॉइन्स ची उपलब्धता .
100INR 
 

पुढे आपण पाहणार आहोत शुल्क चे प्रकार आणि व्यवहार. 
💠फियाट ठेव (Fiat deposit) - 
मोफत (Free)
💠 फियाट काढणे (Fiat withdrawal) - 
मोफत (Free)
💠 क्रीप्टो ठेव ( crypto deposit) - 
मोफत (Free)
💠 क्रीप्टो काढणे (crypto withdrawal) - क्रीप्तो करन्सी वर अवलंबून.
💠 ट्रेडिंग शुल्क (Trading Fee ) - 
निर्माता आणि घेणारा (maker and taker) शुल्क हे जास्तीत जास्त 0.50% असू शकतं. तेही शेवटच्या 30 दिवसांच्या ट्रेडिंग वरून ठरवले जाते.

● कॉइन स्विच (Coin switch) :

भारतातील क्रीप्टो करन्सी खरेदी विक्री मार्केट मध्ये, हे एक भयंकर खेळाडू म्हणून उदयास आले. उत्कृष्ट उपलब्ध दरामधे वापरकर्त्यांना ट्रेड करण्यास क्रीप्टो करन्सी परवानगी देते. 


मापदंड (parameters) कॉइन स्विच वैशिष्ट्ये (features)
वापरकर्ताशी मैत्रीपूर्ण (user friendliness) मोठ्या प्रमाणात क्रीप्टो ट्रेडिंग जोड्या उपलब्ध. स्वच्छ मांडणी.
सुरक्षा वैशिष्ट्ये (security features) उद्योग मानक सुरक्षा उपाय, माहिती कटिबद्ध, दोन भागांत प्रमाणीकरण (2FA), कोल्ड स्टोरेज
नवशिक्यांसाठी मैत्रीपूर्ण (beginners friendliness) सरळीकृत खरेदी आणि विक्री इंटरफेस, कमीतकमी गुंतवणूक ही कमी.
दीर्घकालीन उपयोगिता (long term usability) आणि कमीतकमी गुंतवणूक (minimum investment) क्रीप्टो बास्केट ची सुविधा. सरळीकृत विविधिकरणाचा प्रस्ताव
100 INR 


पुढे आपण पाहणार आहोत शुल्क चे प्रकार आणि व्यवहार.

💠फियाट ठेव (Fiat deposit) - 

मोफत (Free)

💠 फियाट काढणे (Fiat withdrawal) - 

मोफत (Free)

💠 क्रीप्टो ठेव ( crypto deposit) - 

मोफत (Free)

💠 क्रीप्टो काढणे (crypto withdrawal) - क्रीप्तो  करन्सी वर अवलंबून.

💠 ट्रेडिंग शुल्क (Trading Fee ) - 

निर्माता आणि घेणारा (maker and taker) शुल्क हे जास्तीत जास्त 0.1% असू शकतं. तेही शेवटच्या 30 दिवसांच्या ट्रेडिंग वरून ठरवले जाते.

● मुद्रेक्स (Mudrex ) :

मापदंड (parameters) मुड्रेक्स वैशिष्ट्ये (features)
वापरकर्ताशी मैत्रीपूर्ण (user friendliness) वापरण्यासाठी सरळ आणि सोप.
सुरक्षा वैशिष्ट्ये (security features) दोन भागांत प्रमाणीकरण (2FA) अनिवार्य, FIU, PMLA आणि GDPR तक्रारी.
नवशिक्यांसाठी मैत्रीपूर्ण (beginners friendliness) खरेदी आणि विक्री सोपी 
दीर्घकालीन उपयोगिता (long term usability) आणि कमीतकमी गुंतवणूक (minimum investment) क्रीप्तो बास्केट ची सोय. दीर्घकालीन गुंतवणूकिसाठी सरळीकृत विविधिकरण ऑफर.

पुढे आपण पाहणार आहोत शुल्क चे प्रकार आणि व्यवहार. 
💠फियाट ठेव (Fiat deposit) - 
मोफत (Free)
💠 फियाट काढणे (Fiat withdrawal) - 
1% to 18% GST शुल्क 
💠 क्रीप्टो ठेव ( crypto deposit) - 
मोफत (Free)
💠 क्रीप्टो काढणे (crypto withdrawal) - व्यवहाराच्या रकमेतील 2%. (कमीतकमी - $0.5; जास्तीतजास्त - $0.25%)
💠 ट्रेडिंग शुल्क (Trading Fee ) - 
गुंतवणूक मोफत. विमोचन (redemption) - 1% ; जर एका महिन्याच्या आत काढले तर. पुनः संतुलन ( Rebalancing) - जवळपास 0.25% ते 1% प्रतीमह.

●वझिर एक्स (Wazir X) :

भारतातील एक जलद गतीने पसरलेले क्रीप्तोकरन्सी देवाणघेवाण करण्यासाठीचे माध्यम. 60 लाख वापरर्त्यांची नोंद असणारे. हे पिअर टू पिअर हा प्लॅटफॉर्म देते.

पुढे आपण पाहणार आहोत शुल्क चे प्रकार आणि व्यवहार. 

💠फियाट ठेव (Fiat deposit) - 

मोफत (Free)

💠 फियाट काढणे (Fiat withdrawal) - 

मोफत (Free)

💠 क्रीप्टो ठेव ( crypto deposit) - 

मोफत (Free)

💠 क्रीप्टो काढणे (crypto withdrawal) - क्रीप्तो करन्सी वर अवलंबून.

💠 ट्रेडिंग शुल्क (Trading Fee ) - इंडस्ट्री तील कमीतकमी ट्रेडिंग शुल्क हे 0.05% - 0.2% च्या मधे येते. 

●झेबपे (Zebpay) : 

2014 च्या सुरवातीला याची स्थापना झाली. महिन गुप्ता , संदीप गोयंका आणि सौरभ अग्रवाल यांनी केली. क्रीप्तो करन्सी मधे ट्रेडिंग साठी देशातील जलदगतीने वरती आलेलं हे एक सर्वात मोठ प्लॅटफॉर्म बनल आहे.

पुढे आपण पाहणार आहोत शुल्क चे प्रकार आणि व्यवहार. 

💠फियाट ठेव (Fiat deposit) - 

मोफत (Free)

💠 फियाट काढणे (Fiat withdrawal) - 

मोफत (Free)

💠 क्रीप्टो ठेव ( crypto deposit) - 

मोफत (Free)

💠 क्रीप्टो काढणे (crypto withdrawal) - क्रीप्तो करन्सी वर अवलंबून.

💠 ट्रेडिंग शुल्क (Trading Fee ) - 

पूर्वी ट्रेडिंग शुल्क आकारले जात होते पण आता नाही. पण जर UPI द्वारे पैसे जमा केले तर ₹15 आणि ऑनलाईन बँकिंग द्वारे जमा केले तर 1.77% शुल्क आकारले जाते.

💠 क्रीप्तो ठेव(Deposite) आणि क्रीप्तो काढण्यासाठी (withdrawal) भारताबाहेर निःशुल्क आहे. पण भारतात 0.0006BTC इतका चार्ज आकारला जातो.

धन्यवाद......!



Post a Comment

0 Comments